एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ED सरकार या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरले आहे – सुप्रिया सुळे

24
सांगली जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे म्हटले जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भीमराव सूर्यवंशी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले कि, ही अतिशय दुःखद घटना आहे. कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एस.टी. चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन आत्महत्या केली. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ED सरकार या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरले आहे.
या गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला, हे अतिशय संतापजनक आहे. ED सरकार कृपया आपण एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.