स्व. मुक्ताताईंएवढंच प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री – चंद्रकांत पाटील

29

पुणे : कसब्यातील पोटनिवडणुकीत राजकीय पक्षातील नेत्यांनी आता धुमधडक्यात प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर याच्यात मोठी लढत होणार आहे. यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आज कसब्यातील अनेक भागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटलांनी आज मनसेचे नेते गणेश भोकरे आणि काॅंग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब दाभेकर यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार संजय काकडे देखील उपस्थिती होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माजी नगरसेवक सम्राट थोरात यांच्या घरी जाऊन देखील त्यांनी भेट घेतली.

तसेच चंद्रकांत पाटलांनी आज महात्मा फुले पेठ परिसरातील मतदारांशी संवाद साधला. भापजपाला मतदारांचं भरभरून प्रेम मिळतंय. स्व. मुक्ताताईंएवढंच प्रेम हेमंत रासने यांनीही मिळेल, याची खात्री आहे. मतदारांशी संवाद चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. तसेच कसबा पोटनिवडणुक भाजप विरोधात काॅंग्रेस अशी आहे. पण भाजप विरोधात लोकसभा निवडणुकीतही टिकू शकली नाही आणि या निवडणुकीतही टिकणार नाही, कारण येथे मतदान लोकहिताच्या निर्णयांवरच होतं. असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच आज रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा विजय संकल्प मेळाव्यात देखील चंद्रकांत पाटलांनी सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी हेमंत रासने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.