निवडणूक आयोगाच्या निकालावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया, सत्याचा विजय झाला…
पुणे : राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता बदलानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. शुक्रवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का देत असे जाहीर केले कि, शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. एकूणच प्रक्रियेवर विश्वास राहिला नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या निर्णयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि , हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा त्यांची सत्ता येते तेव्हा ईव्हीएम चांगले असते. गुजरातमध्ये १५६ जागा आल्या कि ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम असतो. मध्य प्रदेशमध्ये आता भाजपची सत्ता आहे पण यापूर्वी जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ईव्हीएम चांगले आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला तर न्यायालय चांगलं असत. त्यांची सत्ता गेल्यापासून किरकिर चालू आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण भाष्य करणं योग्य नाही पण आम्ही एवढंच म्हणू शकतो कि सत्याचा विजय झाला आहे. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे म्हणत आहेत कि अन्याय झाला. न्यायालयाचा निर्णय जेव्हा त्यांच्या बाजूने येतो तेव्हा सगळं छान आहे आणि विरोधात येतो तेव्हा अन्याय झाला असे ते म्हणत असतात.
चंद्रकांत पाटील याची पुढे म्हटले कि, ज्यावेळी आमचे १२ आमदार डिस्क्वॉलीफाय झाले. यामध्ये मी स्वतः , देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते, आम्ही आमच्या जागेवर उभे होतो, आशिष शेलार यांचा तर काही संबंध नव्हता. ते आमच्या मागे उभे होते. हे सुरुवातीला राजकारण कोणी केले ? , असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. एक साधी केतकी चितळेची पोस्ट पडली तर महिनाभर त्या अभिनेत्रीला जामिनासाठी या पोलीस स्टेशनला , त्या पोलिसस्टेशनला घेऊन जा, अगदी कंगना राणावत चे देखील उदाहरण आहे कि कसे त्यांचे बंगले तोडले. मग तुमच्या बंगल्यावर हात घातला तर अन्याय अन्याय असे म्हणणार. न्याय विकत घेतला असे म्हणणार, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.