मुक्ताताईंचा निष्ठेचा वारसा पती आणि मुलगा नेत आहेत पुढे; भाजपच्या विजयासाठी घेत आहेत मेहनत

20

कसबा : उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll) भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने भाजपाच्या जेष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच ताकत लावली आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक लागली असून भाजपाने मुक्ता टिळकांच्या कुटुंबातून उमेदवार न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवले आहे.

दिवंगत नेत्या मुक्ता टिळक या भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते. मुक्ता टिळक यांनी जपलेला हा निष्ठेचा वारसा आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि मुलगा कुणाल टिळक (Kunal Tilak) यांद्वारे पुढे नेला जात आहे.

हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत मोठ्या मतांनी विजयी करण्यासाठी भाजपा कसून प्रचार करत आहे. अगदी त्यांच्याप्रमाणेच शैलेश आणि कुणाल टिळकही खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसत आहेत. आपल्याला उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक (Shailesh tilak) हे सुरुवातीला काहीसे व्यथित झाले; मात्र त्यांनी मुक्ता टिळक यांनी ज्याप्रमाणे पक्षादेश मानून स्वतः निष्ठेने भाजपमध्ये काम केले त्याच प्रमाणे शैलेश टिळक हेदेखील रासने यांच्यासाठी झोकून देवून काम करत आहेत. याशिवाय कोणत्याही प्रकारचा राग मनात न ठेवता पक्ष निष्ठेचा आपल्या आईचा वारसा पुढे नेत पक्षाचा आदेश मानून कुणाल टिळक हेदेखील दिवसरात्र एक करताना दिसत आहेत.

या बाप-लेकांच्या कामगिरीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता त्यांच्या या मेहनतीचे फळ भाजपला निवडणुकीत मिळेल की नाही?, हे पाहावे लागणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.