विधानसभा पोट निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

7

पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपचे सर्व नेतेमंडळी सध्या व्यस्त आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, यासोबतच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रासने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हि निवडणूक जाहीर होताच जोमाने तयारीला लागले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी काल कसबा पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदानात विजय संकल्प सभेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. राज्यातही एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार अनेक लोकोपयोगी कामे करत आहे. त्यामुळे पोट निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मतदार बंधू-भगिनींना केले.

यावेळी मंत्री मंडळातील रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपा नेते शैलेश टिळक, श्रीनाथ भिमाले, कुणाल टिळक, रिपाइं आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.