एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांची भली मोठी यादीआहे – चंद्रकांत पाटील

7

पुणे : विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या सभा, संवाद यात्रा यांचा धडाका सुरू आहे. सोमवारी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप – शिवसेना महायुतीच्या यशावर भाष्य केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांची भली मोठी यादीआहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसा देशाचा विकास केला, देवेंद्र फडणवीस यांनी जसा महाराष्ट्राचा विकास केला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सात महीन्यांच सरकार असताना, अजूनही पुढे बराच कालावधी असताना इतके विषय संपवले. ७५ च्या वर ज्यांचे वय आहे त्यांना एसटी फ्री. याचा इतक्या लोकांनी फायदा उचलला. जवळपास एक कोटी लोकांनी सहभाग घेतला.,

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि उद्धवजी नुसते घोषणाच करत आहेत असे पाटील यांनी म्हटले. उद्धवजींनी घोषणा केली पण ते पैसे एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीचा संप, अक्षरशः घरावर नांगर फिरले, कसाबसा हा संप संपला. ज्या मागण्या मान्य झाल्या त्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण करत आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

हे सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे सरकार लोकांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. १४ ते १९ देवेंद्रजींनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलय. या करंट्याना ते टिकवता आल नाही असा हल्लाबोल पाटील यांनी केला. यांना नीट बाजू मांडता आलं नाही. हे आरक्षणं पुन्हा मिळवून देण्याचं एकनाथजी आणि देवेंद्रजींनी संकल्प केला. तोपर्यंत जे ओबीसींना ते मराठ्यांना आशाप्रकारची घोषणा करण्यात आली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.