मतदारसंघांमध्ये प्रॉपर्टी कार्ड, रीडेव्हलपमेंट आणि इतर सर्वच कायदेशीर प्रश्नावर मार्गदर्शनासाठी वकिलांची टीम तयार करा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

4
पुणे : सुहास पटवर्धन यांच्या सहकार्यानं कसबा मतदारसंघात अधिवक्ता आणि गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी सहकारविषयक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच आमदार प्रवीण दरेकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले कि, माझ्या संकल्पनेनुसार कोथरूड मतदारसंघाप्रमाणेच इतर मतदारसंघांतही प्रॉपर्टी कार्ड, रीडेव्हलपमेंट आणि इतर सर्वच कायदेशीर प्रश्नावर मार्गदर्शनासाठी वकिलांची टीम तयार करावी, असं आवाहन या वेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
कोथरूडमधील उपक्रमांची माहिती ॲड. मिताली कुलदीप सावळेकर यांनी दिल्यावर आमदार प्रवीण दरेकर, जेष्ठ विधिज्ञ वसंतराव कर्जतकर तसंच सुहास पटवर्धन यांच्यासह उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या वेळी शैलेश टिळक आणि जेष्ठ विधिज्ञ शंतनू खुर्जेकरही उपस्थित होते.
कोथरूड मतदारसंघांतील माझ्या अधिवक्ता टीमनं हा उपक्रम राबवला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कसब्यातील नागरिक आणि वकील बांधवांची उपस्थिती या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखितच करत होती. कसबा भाजपाच्याच पाठीशी असल्याची ग्वाहीसुद्धा उपस्थितांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.