कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचे चंद्रकांत पाटील यांचे भाजपा युवा मोर्चास आवाहन

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांच्यावतीने कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी बुधवारी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद (ABVP)च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील संघर्षाचे अनुभवही सांगितले. तसंच कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचं चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना आवाहन केलं.