पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यातील रविवार पेठ येथील माहेश्वरी समाज कापडगंज व्यापारी बांधवांशी संवाद साधला. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विनोद काकाणी, सेवा प्रकोष्ठचे समन्वयक शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी एकूणच भाजपच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महाविद्यालयांमध्ये जे शिपाई, क्लर्क आणि इतर कर्मचारी असतात, अशा १८ हजार जणांचा प्रश्न रखडलेला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी माझ्यासोबत तातडीने संपर्क साधून या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न कसा सोडवला याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी एक आठवण सांगितली कि, अनेक वर्षांपासून एक प्रश्न रखडलेला होता. कॉलेजमध्ये जे शिपाई असतात, क्लार्क असतात, घंटा वाजवणारे असतात, अशा १८००० लोकांचा प्रश्न बरेचवर्ष पेडिंग होता. मला अक्षरशः २ वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला परीक्षा सुरु होत आहेत. यांनी संप केला तर प्रॉब्लेम होईल. मी रात्री २ वाजता माझ्या सेक्रेटरींना बोलावून त्यांना सांगितलं कि उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत यावर निर्णय घ्यायचा आहे. मी सकाळी ११ वाजता ऑनलाईन सही केली त्या फाईलवर. त्यावेळी देवेंद्र फडणवीस एका बैठकीला येणार होते. त्यावेळी त्या परिस्थतीत त्यांनी आधी त्या फाईलवर सही केली. अशा प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी हि आठवण सांगितली.
चंद्रकांत पाटील यांनी हि आठवण सांगण्यामागे कारण कि भाजपच्या नेतृत्वाला , नेत्यांना समाजातील प्रत्येक व्यक्तीची ,मग तो शिपाई का असेना . त्यांच्या मागण्यांना तितकेच महत्व देऊन त्या पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवले जाते.