गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
पुणे : पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ते भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधातील एका उमेदवाराला पाठींबा देत असल्याचे सांगण्यात येत होते मात्र आता अक्षय गोडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
कसब्याच्या पोटनिवडणुकीत माझा जाहीर पाठिंबा हेमंत रासने यांना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, माझे आणि हेमंत गोडसे यांचे अनेक वर्षांपासूनचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. हेमंत रासने हे गेले अनेक वर्षे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत चांगले काम करत आहेत. आता ते या विधानसभेच्या पोटनिवडणूकीट उभे आहेत. गेली ७०-८० वर्षे गोडसे-रासने कुटुंबाचा घरोबा आहे. प्रत्येक सुखदुखात ते आमच्या सोबत असतात. नगरसेवक झाले त्यावेळीही ते आशीर्वाद घेण्यासाठी तात्यासाहेबांकडे आले होते. आता या निवडणुकीत देखील गोडसे कुटुंबाचा पाठींबा त्यांनाच असल्याचे मी जाहीर करतो असं अक्षय गोडसे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षातील त्या उमेदवाराला आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हंटलं नाही. ते उमेदवार मला सहज भेटायला आले होते. त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता मी हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अक्षय गोडसे यांनी सांगितले आहे.