अर्थसंकल्पी अधिवेशनात अधिकाधिक कामकाज व्हावं, त्यात विरोधकांनीही सहभागी व्हावं, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : आज पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडून राज्याच्या आर्थिक नियोजनाची पायाभरणी होते. जनहिताचे विविध निर्णय विविध कामांची दिशाही ठरते. अशा महत्त्वाच्या अधिवेशनात अधिकाधिक कामकाज व्हावं, त्यात विरोधकांनीही सहभागी व्हावं, असं संसदीय कार्यमंत्री या नात्यानं चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले.
आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. यासाठी संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या अधिवेशनात अधिकाधिक कामकाज करण्याचे आवाहन केले. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमजी गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचं संसदीय कार्यमंत्री या नात्यानं चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती देताना म्हणाले कि, राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्वाचे विधेयक या अधिवेशनात येणार असून हे अधिवेशन चार आठवडे चालणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.