१५ व्या फेरीत कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर … ६ हजार ७०० मतांची घेतली आघाडी

33

कसब्यामध्ये काटे कि टक्कर सुरु आहे. मतमोजणी अद्याप सुरु आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार १५ व्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ६ हजार ७०० मतांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. कसब्यात मुक्त टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती.

कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबापैकी कोणालाही उमेदवारी न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून संपूर्ण ताकद येथे पणाला लावण्यात आली होती . परंतु  आज निकालाच्या दिवशी चित्र बदललेले आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी म्हटले कि, लोकांनी पैसे घरात ठेवले आणि हृदयातल्या धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथुंन सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपला जनतेने कात्रजचा घाट दाखवलाय अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली आहे.  भाजपच्या भूमिकेचा विरोध करत हिंदू महासभेकडून आनंद दवे यांनीही उमेदवारी दाखल केली. हि निवडणूक बहुरंगी होताना पाहायला मिळाली

Get real time updates directly on you device, subscribe now.