कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी… भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय

21

कसबा आणि चिंचवड येथील निवडणूक जाहीर होताच भाजप आणि महाविकस आघाडी यांनी  आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. या निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पहिल्या दिवसापासून वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा  ऐतिहासिक विजय झाला आहे.  भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा आज विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा ११ हजार ४० मतांनी विजय झाला आहे.

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हत्ती, तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने या ठिकाणी आपली संपूर्ण ताकद लावली होती. प्रचार सभा , रॉड शो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची हजेरी, भाजपचे सर्व जेष्ठ नेते या सर्वानी प्रचारात सहभाग घेतला होता. परंतु आज निकाल हाती आल्यावर काँग्रेसकडून भाजपचा पारंपरिक मतदारसंघ हिरवी घेतला असल्याचे चित्र दिसत आहे.
कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपली आघाडी कायम ठेवली. कस्ब्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले.काँग्रेस आणीन महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल ३० वर्षांनी भाजपाकडे असणारा हा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसने अप्लाय हाती घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.