कोल्हापूरमध्ये मोफत फिरता दवाखाना’ चं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

8

आज कोल्हापूरमध्ये ‘मोफत फिरता दवाखाना’चं लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार मिळावेत, अशी संकल्पना चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. या अनुषंगाने वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून हा दवाखाना सुरू करण्यात आला. असल्याचे पाटील यांनी सांगितले. या मोफत फिरता दवाखान्याचा कोल्हापूरकरांना निश्चितच लाभ होईलअसे हि मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, महेश जाधव, नवोदिता घाटगे, सत्यजीत कदम ,राहुल चिकोळे, हिंदुराव शेळके यांच्या समवेत कोल्हापुरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोफत फिरता दवाखान्यास पुण्यातही नागरिकांचा प्रतिसाद

चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार असल्याने मोफत फिरता दवाखाना उपक्रम त्याठिकाणी देखील सुरू आहे. अनेक मध्यम वर्गीय नागरिकांना या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा देण्याचे काम केले जाते. याउपक्रमाचा कोथरूडमधील गरजू नागरिक आवर्जून लाभ घेतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.