कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपनं जिंकली हे शरद पवार विसरले, एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

12

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चांगलेच गाजत आहे.  वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होत आहेत. अवकाळी पावसावरून तर जोरदार खडाजंगी सुरू आहे. यातच नुकत्याच पार पडलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादीने भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू  लागली आहे.  या घटनेवरून आज विधाननसभेत चांगलाच वाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात अजित पवार यांना टोला लगावला.

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँड निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. ते म्हणाले कि, गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीय. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. हि कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा चौकशी.  कारण नसताना  कुणावरही कसलेही आरोप का करताय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले कि, अजित दादा , गुलाबराव पाटलांनी नागालँड विषय काढला, तो आजचा विषय नव्हता खरंतर. पण जस तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता.. तुम्ही ऐकायची सवय करा. एवढच आहे कि जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. तुम्ही आत्तापर्यंत बोलत होतात कि बदलाचे वारे वाहात आहेत. गुलाबराव पाटलांनी एवढंच विचारलं कि हे बदलाचे वारे आहेत का?

शिंदे पुढे म्हणाले कि, भुजबळ साहेब तुम्ही काय म्हणालात, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, म्हंणजे सरकारला नाही, हे कुठलं तत्वज्ञान ? आपलं ठेवायचं झाकुनि, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. ते आत्तापर्यंत जे काही बोलले त्याच्या नेमकं उलट घडलंय हे आपल्याला माहिती आहे. कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपनं जिंकली हे शरद पवार विसरले, असा टोला शिंदे यांनी लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.