पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत गुरुवारी सादर केला.   हा अर्थसंकल्प म्हणजे  सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची  प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या अर्थसंकल्पात पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत अर्थसंकल्पातील पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.
पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय पुढील प्रमाणे : –
१. पुरे रिंग रोडसाठी आणि पुणे मेट्रो साठी भरीव निधीची तरतूद
२. पुण्यातील मेट्रोची ८१३३ कोटींची कामे प्रगतीपथावर
३. पुणे – पिंपरी नवा कॉरिडॉर उभारणार
३. बालेवाडी येथील स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार
४. नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निधी
५. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
६. पुण्यातील दोन शैक्षणिक संस्थांना ५०० कोटींचे विशेष अनुदान
७. भिडे वाडा येथे सावित्रीबाई फुले याच्या स्मारकासाठी ५० कोटींचा निधी
८. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रस्तावित
९. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढुबुद्रुक स्मारकांसाठी निधी
वरिलप्रमाणे अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. एकूणच समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन राज्याला समृद्ध करणारा विकासाचा महाअर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली . पुणेकरांना देण्यात येणाऱ्या या सुविधांसाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.