राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीने आणखी दोन ग्रंथांची निर्मिती करावी- चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक संपन्न झाली.  राजर्षि शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा आणि राजर्षि शाहू महाराज समकालीन अशा दोन ग्रंथांची निर्मिती करण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत, अशा सूचना समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, राजर्षि शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा आणि राजर्षि शाहू महाराज समकालीन असे दोन ग्रंथ निर्मिती करण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत. राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीसाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी घेतली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक(उच्च शिक्षण) डॉ.  शैलेंद्र देवळाणकर, समितीचे सदस्य सचिव विजय चोरमारे, रमेश चव्हाण, दत्ता पवार आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!