भारताची ऐतिहासिक कामगिरी, दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

4
सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून गौरवण्यात येणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात  भारताने यंदा दोन श्रेणीत पुरस्कार मिळवत आपले नावलौकिक केले आहे. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एन्जलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. भारतीयांसाठी हा सोहळा अभिमानस्पद ठरला. या सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ने बाजी मारली आहे.   तसेच आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू  गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
द एलिफंट व्हिस्परर्स’ हि नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणीन त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत. गुणित मोंगा साडी नेसून मंचावर ऑस्कर पुरस्कार घेण्यासाठी गेल्याने त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.