रक्तदानासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोककल्याणाचे काम निरंतर सुरू राहिले पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : कोथरूड मतदारसंघातील कांचनगंगा सोशल फाउंडेशनचा आज तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिरास भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

