मिल कामगारांच्या घरांच्या बाबतीत लवकरच बैठक घेणार, चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

मुंबई : मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न हा महत्वचा मुद्दा असून चालू असलेल्या मिल कशा प्रकारे कार्यरत ठेवता येतील यावर उपाय शोधले जाणार आहेत. तसेच बंद पडलेल्या मिल कामगारांच्या घराच्या बाबतीत लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले.