पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  बाणेर येथील कम्फर्ट  झोन सोसायटीत सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि व्हॅनिशिंग मशीनचे लोकार्पण

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज बाणेर येथील कम्फर्ट  झोन सोसायटीत सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि व्हॅनिशिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले. कोथरूडमधील काही सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे मशीन कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, कोथरूडमधील घरकाम करणाऱ्या ताईंचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी, त्या काम करत असलेल्या सोसायटींमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि व्हॅनिशिंग मशीन कार्यान्वित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमातील दुसरे मशीनचे बाणेरमधील कम्फर्ट झोन सोसायटीत कार्यान्वित करण्यात आले. आज त्याचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आवाहन केले कि, या उपक्रमाचा जास्तीत जास्त घरकाम करणाऱ्या ताईंनी लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.