मुंबई इंडियन्सची दमदार कामगिरी, दिल्लीला हरवून बनली पहिली चॅम्पियन

24

मुंबई इंडियन्सने आज इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. हरनप्रीत कौर हिच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकवण्यात मुंबई इंडियन्सला यश आले आहे. ब्रेबोर्न स्टेडियमवर दिल्ली कपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या. मुंबईने १९. ३ षटकांत तीन  गडी गमावून १३४ धावा करून सामना जिंकला.

इंग्लंडची अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रन्टने महिला प्रमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. तिने ५५ चेंडूत नाबाद ६० धावा करत संघीक विजेतेपद पटकावले. मुंबईच्या खात्यात हि सहावी ट्रॉफी आहे.  नीता अंबानी यांनी देखील जल्लोष केला.

नतालीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत १४ धाव करून नाबाद राहिली.हरमनप्रीत कपूरने ३९ चेंडूत ३७ धावा केल्या आणि ती बाद झाली.

दिल्लीच्या दिग्गज फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लाँनिंगने २९ चेंडूंत ३५ धावा केल्या. मुंबईकडून इस्सी आणि हिली नवे प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलियाने दोंन बळी घेतले.  य विजयानंतर मुंबई इंडियन्सने एकच जल्लोष केला. तंबूत बसलेल्या महिला खेळाडू मैदानावर धावत गेल्या आणि आपल्या दोन्ही फलंदाजांची गळाभेट घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.