पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या महत्वाच्या विषयांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील अनेक महत्वाच्या विषयांवरील आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बैठकीतील सर्व विषयांवर सविस्तर माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, एक महिना विधानसभा अधिवेशनात गेल्यामुळे अनेक विषय आढावा घेण्याचे राहिले होते. आता प्रामुख्याने मेट्रो, पुणे शहरातील रस्ते, जायका, नदीसुधार आणि २४ * ७ अशा काही विषयांचा आढावा घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्प
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, मेट्रोचा प्रकल्प कसा हळूहळू आपल्यासमोर आला हे महत्वाचे आहे. टीका टिपणी करणं हे अनेकांचं कामचं आहे. पण यात काय काय अडचणी असतात , हे पप्रोजेक्ट कसे उभे राहतात हे चित्र तुमच्यासमोर येण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले. पहिला टप्पा हा मेट्रोचा सुरु झाला. तसा तो छोटा टप्पा आहे त्यामुळे आपल्याला आवश्यक असणार अंतर पूर्ण करणारी नव्हती पण पुढचा टप्पा सुरु झाला कि सोयीस्कर होईल. ३१ मार्चला तो टप्पा पूर्ण होणार होता परंतु तो होऊ शकला नाही त्यामुळे अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. १ महिना जिल्ह्यातील क्रशर बंद होते. त्यामुळे अनेक बांधकाम बंद होती. परंतु हा पुढचा टप्पा मी म्हणेन कि १५ मे पर्यंत पूर्ण होईल. तर खूप चांगल्या संख्येने लोक मेट्रोकडे शिफ्ट होतील असा दावा पाटील यांनी केला.
पुणे शहरातले प्रगतीपथावरील रस्ते .
पावसाळ्यामध्ये जे रस्ते खराब आले होते त्यामधील ३०० कोटींचे रस्ते सॅंक्शन झाले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे खराब रस्ते निट करणे, त्यासोबत फुटपाथ व्यवस्थित करणे असे काम पूर्ण होईल. यामध्ये कात्रज- कोंढवा हा रास्ता आहे त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. मुंबई- पुणे रस्ता हा देखील महत्वाचा विषय आहे. याचे काम देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे पाटील यांनी सांगितले.
जायका प्रकल्प
या विषयांमध्ये एकूण ११ स्टेशन्स होतील. हे ११ स्टेशन्स पूर्ण झाल्यावर पूर्ण शहरातील सांडपणी हे ट्रीट होईल आणि ट्रीट केलेलं पाणी हे नदीला जाईल. हा जवाजवळ ९०० कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे. जास्तीत जास्त रक्कम ८०० कोटी हि केंद्र सरकारने दिलेले कर्ज नसून अनुदान आहे. हा प्रोजेक्ट साधारणतः २०२५ च्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे पाटील म्हणाले.
२४ * ७
हा त्याच्यासोबतचा विषय आहे. तो पूर्ण झाल्यावर मोठी गळती आहे जी आपल्या शहरातील ती संपेल. जवळजवळ काही टीएमसी पाणी या गळती मध्ये जात आहे. एकूण ८२ टाक्या होणार आहेत. त्यातील जवळपास ४२ टाक्या या पूर्ण झाल्या आहेत आणि २० टाक्या या पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रोजेक्ट देखील पूर्ण होईल.
नदीसुधार प्रकल्प
या प्रकल्पात नदी तर सुंदर होणारच पण नदीचा काठ सुंदर करण्यावर भर असेल त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. मुळा – मुठा नदी च्या या प्रकल्पसाठी एकूण ११ पैकी तीन पॅकेजेस हि पहिल्या टप्प्यात पूर्ण होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.