अचलपूरची ‘फिनले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

24

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल सुरू करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मिल सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच मिल सुरू होईपर्यंत कामगारांना अर्धे वेतन देण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वासित केले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल्स हा ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत होते. कोविड काळातील अडचणीमुळे मील बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही मिल सुरू करणे आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत  पाटील म्हणाले की, मिल सुरू होईपर्यंत कामगाराना अर्धवेतन देण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

यावेळी आमदार ओमप्रकाश (बच्चु) कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष व सरव्यवस्थापकीय संचालक आशुतोष गुप्ता व सबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.