चार पक्ष वेगवेगळे लढले तर भाजपाच क्रमांक एक वर असेल – चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आगामी निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडी बाबत चंद्रकांत पाटील म्हणाले कि मी दोनच दिवसापूर्वी म्हटलं होत कि तीन पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढणं हे आमच्यासाठी चॅलेंज अशासाठी नाही कारण अजून सहा महिन्यांनी महानगरपालिका, त्यानंतर सहा महिन्याने लोकसभा , नंतर विधानसभा एवढा काळ ते एकत्र राहणे शक्य नाही.चार वेगवेगळे लढले तर आम्हीच क्रमांक एक वर आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जे मांडले २०० क्रॉस होईल याबाबत शंकाच नाही असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, शरद पवार साहेब हे त्यांच्या नावाप्रमाणे पॉवरफुल नेते आहेत. ते गेल्याशिवाय सर्व पक्ष एकत्र येत नाहीत. ते बाहेर पडले कि गळून पडतात. ते जर सावरकरवादी झाले तर विरोधकांचे दात आणि नख गळूनच पडतील असे आहे, अशी टिपणी पाटील यांनी केली.
सर्व विरोधी पक्षांना माझं हेच आवाहन आहे कि आपण मुद्द्यावर लढलं पाहिजे, आपण जे मुद्दे नाहीत त्यावर बोलण्यात काही उपयोग नाही, हे अजित पवारांना कळलं तर हळूहळू अनेकांना कळेल, असे पाटील मिश्कीलपणे म्हणाले.
बाबरी मस्जिद पडली तेव्हा भाजपवाले पळून गेले असा आरोप करण्यात येतो त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली कि, असं म्हणण्याने इतिहास बदलला जात नाही. साडे पाचशे वर्ष हा हिंदूंच्या वेगवेगळ्या राज्यातील संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेपासून प्रेरणा घेऊन काम करणारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, यांच्या नेतृत्वाखाली संपला. हे सर्वसामान्यांनी पाहिलं आहे हि श्रेयाची लढाई कशासाठी?, असे पाटील यांनी म्हटले.