क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली गेली, त्या भिडे वाड्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी आमदार दिपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून तिथे येणाऱ्या नागरिकांसाठी एकता  मिसळ बनवण्याचा उपक्रम  राबविला गेला आहे.  क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्यावतीने समता भूमीत येणाऱ्या बांधवांसाठी एकता मिसळची व्यवस्था करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल १ लाख बांधवांसाठी मिसळ तयार केली आहे. विष्णू मनोहर यांनी तब्बल पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाला भेट देऊन यामध्ये योगदान दिले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली गेली, त्या भिडे वाड्याला देखील आज भेट दिली. यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.