पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डिक्कीच्या माध्यमातून ‘स्टॅड अप इंडिया’ उपक्रमाअंतर्गत पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या २० टँकरचे लोकार्पण

पुणे : आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी भेटी देऊन अनेक उपक्रमात सहभाग घेतला . यावेळी डिक्की या संस्थेला देखील भेट  दिली आणि त्यांच्या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डिक्कीच्या माध्यमातून ‘स्टॅड अप इंडिया’ उपक्रमाअंतर्गत पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या २० टँकरचे लाभार्थ्यांना लोकार्पण केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवले. या जगात काहीतरी करुन दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा तुमच्याकडे असली पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली. डिक्कीच्या माध्यमातून असेच कार्य सुरू आहे. त्यांचे हे कार्य असेच निरंतर सुरू राहो, अशा शुभेच्छा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे आशुतोष कुमार, पश्चिम विभागाचे अध्यक्ष अविनाश जगताप, संतोष कांबळे, मुकुंद कमलाकर, सीमा कांबळे, राजेंद्र साळवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.