उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

मुंबई  : आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

विद्यापीठाचे नियम, परिनियम व विनियम प्रकरणे तातडीने राज्यपाल यांच्याकडे सादर करावे, विद्यापीठाच्या संविधानिक पदभरतीबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करावा, विद्यापीठाच्या बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, हे प्रलंबित  बांधकाम तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्र व उपकेंद्राकरिता जागा उपलब्ध करून घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये सायबर सेक्युरिटी स्कूल सुरू करणे आणि बांधकाम पूर्ण होत असलेल्या इमारतीचे भूमिपूजन करून तातडीने सुरू करणे याबाबत आढावा देखील  घेतला.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सतीश तिडके, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोगी, अधिष्ठाता डॉ.संजय नलबलवार, अधिष्ठाता डॉ.सचिन पोरे, अभियंता विलास चव्हाण,कार्यकारी अभियंता श्री.नामदे, श्रीमती.गायकवाड, विशेष कार्य अधिकारी प्रकाश आव्हाड व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!