आपल्या पक्षाचे सर्व कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने राबवावेत, चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : आज भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने महाबैठकीचे आयोजन करण्यात आले. डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक पार पडली.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाची मंडलनिहाय संघटनात्मक बैठक आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पक्षाचे सर्व कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने राबवावेत, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

आगामी काळात असणाऱ्या निवडणुका, बूथ सशक्तीकरण संघटना विस्तार आणि केंद्र आणि राज्याचे विविध कार्यक्रम या अनुषंगाने बैठकीत बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. पुणे शहरात भारतीय जनता पार्टी संघटनात्मक पातळीवर मजबूत असून ती अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत एकमुखाने करण्यात आला.

बैठकीला सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, दिलीप कांबळे, रवींद्र अनासपुरे, योगेश टिळेकर, राजेश पांडे, धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बिडकर, गणेश घोष, दत्तात्रय खाडे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, संदीप लोणकर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मा. नगरसेवक, बूथ प्रमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!