कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश
पुणे : कोथरूड मधील स्वारद फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, श्याम देशपांडे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजपामध्ये काम करण्यासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी श्याम देशपांडे यांचा मुंबईत प्रवेश झाला. आजही स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून जो प्रवेश होत आहे, त्यामुळे कोथरुडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
स्वाती मोहोळ या स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. कोरोना या संस्थेने अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे केला. स्वच्छतेचे महत्व जाणून घेण्यासोबत नागरिकांना पटवून देण्यासाठी स्वारद फाउंडेशनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळी सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेमार्फत एक घास आपुलकीचा या उपक्रमा अंतर्गत दररोज ५०० गरजू लोकांना अन्न वाटप करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविला जात होता. यासोबतच लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी देखील स्वाती मोहोळ यांनी पुढाकार घेतला. दौड सह राज्यभरात ज्या ठिकणी हिंदू दलित समाजावर अन्याय, अत्याचार आणि हल्ल्याच्या घटना होतात या संदर्भात स्वाती मोहोळ यांनी पुढाकार घेत पुणे पोलिसांना पत्र देखील दिले होते. अशा प्रकारचे अनेक समाज उपयोगी उपक्रम स्वाती मोहोळ यांच्या पुढाकाराने राबविण्यात आले. आजही त्यांचे अनेक समाज हिताचे उपक्रम राबविणे सुरु आहे.