खेळाडूंच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे :  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज त्यांच्या हस्ते  विविध विकासकामांचे भूमिपूजनन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज कोथरूड मतदारसंघातील स्पोर्ट्स युनिव्हर्स चे उदघाटन केले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथे राष्ट्रीय बॅडमिंटनपटू हृषिकेश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स युनिवर्सचे चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. तसेच देशाचा गौरव वाढवत आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला.
यावेळी तरुण भारतचे किरण ठाकूर, रणजीत नातू, निखील कानेटकर, तुषार प्रधान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.