पुणे-बंगळुरु महामार्गावरील भीषण अपघातातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या  प्रशासनाला सूचना

पुणे :  पुणे- बंगळुरू महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. मध्यरात्री २ वाजता या महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून १८  जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. या अपघाताची पालकमंत्री चंद्रकांत पाटील दखल घेतली असून जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पुणे-बंगळुरु महामार्गावरील कात्रज-नऱ्हे याठिकाणी अपघात घडल्याची माहिती मिळाली. मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अपघातात मृत पावलेल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अपघातातील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी पाटील यांनी  प्रार्थना केली आहे.

एका ट्रकने खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला पाठीमागून धडक दिली.हि खाजगी बस नीता ट्रॅव्हल्स कंपनीची होती.  हि बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती मध्यरात्री दोनच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!