राघवेंद्र मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

24

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.  पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संदीपजी आठवले यांच्या स्मरणार्थ राघवेंद्र (बापू) मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि, अभाविपचे यशवंत केळकर यांच्या निधनानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत यशवंतराव होणं अवघड आहे. त्यामुळे चार-पाच जण यशवंतराव व्हा, अशी सूचना दत्तोपंत ढेंगडीजींनी सर्व अभविपच्या कार्यकर्त्यांना केली होती. गिरीशीजींसारखं व्यक्तिमत्त्व होणं अवघड आहे. त्यामुळे चार-पाच जणांना गिरीश बापट व्हावं लागेल. त्यातील एक व्यक्तिमत्त्व बापू मानकर आहे. तो सतत बापट साहेबांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो. वैद्यकीय सेवेसाठी बापट साहेब फार जागृक होते. गरजूंना वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. बापू त्यांचे हेच कार्य पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही रुग्णवाहिका नक्कीच सहाय्यक ठरेल, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी राघवेंद्र बापू मानकर, गौरव बापट, संदीप आठवलेंचे काका प्रकाश आठवले यांच्या सह इतर मान्यवर आणि नागरीक उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.