प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

14

पुणे  : आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आढावा बैठक पार पडली. शासकीय विश्रामगृह येथे हि बैठक आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १५ हजार घरकुलांसाठी मंजुरी देण्यात आली असून उर्वरित कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या ५ हजार अर्जांच्या कागदपत्रांची पूर्तता तातडीने करुन कार्यादेश देण्यात यावेत, असे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष घरकुल बांधकाम सुरु केलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण फार कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्रतिनिधी नियुक्त करावा. त्या प्रतिनिधीने त्या तालुक्यातील कामावर लक्ष दिल्यास कामे लवकर होऊन लाभार्थींना वेळेत लाभ मिळेल.असेही ते म्हणाले. नियुक्त संस्था काम करत नसतील तर त्यांच्याकडून कामे काढून घ्यावीत. कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणा वाढवून घरकुलांच्या कामाला गती द्यावी. याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, सहआयुक्त स्नेहल बर्गे, माजी आमदार बाळासाहेब भेगडे, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.