पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हडपसर येथे बैलगाडा शर्यतीला उपस्थिती…विजेत्यांना पारितोषिक देऊन केला गौरव
पुणे : राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पुन्हा जोमाने सुरु झालेली बैलगाडा शर्यत आता ठिकठिकाणी जोरदार रंगत आहे. ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचा उत्साह अधीकच वाढत आहे. आज शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.