पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हडपसर येथे बैलगाडा शर्यतीला उपस्थिती…विजेत्यांना पारितोषिक देऊन केला गौरव

पुणे : राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पुन्हा जोमाने सुरु झालेली बैलगाडा शर्यत आता ठिकठिकाणी जोरदार रंगत आहे.  ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचा उत्साह अधीकच वाढत आहे.  आज शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.

प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीतील स्पर्धकांचा आणि बैलगाडा प्रेमींचा उत्साह सर्वांनाच भारावून टाकणारा असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.  देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळातील राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही शर्यत पुन्हा अनुभवायला मिळते आहे, याचा आनंद होत आहे. आजच्या अंतिम सामन्याची रंगत अनुभवताना बैलगाडाप्रेमींचा हा आनंद उत्साह पाहून फार समाधान मिळाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेते किरण साळी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.