आपला जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले पाहिजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्र दिनी नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण करुन अभिवादन केले.‌ यावेळी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पदक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणले कि, शासनाने कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. राज्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकरी कुटुंबाना लाभ दिला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात जगाच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ४ हजार २६८ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. सलग दोन वर्ष पीक कर्ज वाटप करण्यात आपल्याला यश आलं. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत देखील वाढ करण्यात आली. राज्यातील नामांकित शिक्षण संस्थाना विशेष अनुदान देण्यासाठी ५०० कोटी अनुदान देण्यात येणार आहे. गामपंचायतीत कौशल्य विकास  कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

वेगाने विकसित होणारे महानगर म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित झाली आहे. त्याच वेगाने इथल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. पुणे  शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड , मेट्रो प्रकल्प यांना गती देण्यात येत आहे. शहरातील नदी सुधार प्रकल्प , सांडपाणी व्यवस्था प्रकल्प , पाणीपुरवठा प्रकल्प अशी विविध कामे गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. लवकरात लवकर ते पूर्ण होईल. आज पासून जिल्ह्यात ११ ठिकाणी हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना माफक दरात सुविधा उपलब्ध होणार आहे. पुण्यामध्ये जी- २० चे विशेष आयोजन करण्यात आले. सगळ्यात चांगली व्यवस्था असणारी बैठक हि पुण्यात झाली. एसटी मध्ये ५० टक्के महिलांना सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक राज्य सरकारच्या अनेक उपक्रमांची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.

आपला जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले पाहिजे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!