समाजोपयोगी उपक्रम राबवून महात्मा बसवेश्वरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कात्रज येथे युवा किर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पाटील यांनी हजेरी लावत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कात्रज येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त युवा किर्तनकार ह.भ.प. चैतन्यमहाराज वाडेकर यांच्या किर्तनसेवेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. माणसांची सेवा हीच ईश्वरसेवेची शिकवण महात्मा बसवेश्वर यांनी दिली. त्यामुळे समाजोपयोगी उपक्रम राबवून महात्मा बसवेश्वरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.