चंद्रकांत पाटील यांनी आज ॲड. प्रशांत देसाई यांची घेतली भेट… बार असोसिएशनच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचेही केले अभिनंदन

8

कोल्हापूर :  कोल्हापूर बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत ॲड. प्रशांत देसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ॲड. देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्यासह बार असोसिएशनच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर येथे नुकतीच बार असोसिएशनची निवडणूक पार पडली होती. यामध्ये देसाई पॅनलचा विजय झाला. ॲड. प्रशांत देसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली. या विजयाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी देसाई यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. अजित मोहिते, ॲड. गिरीश खडके, नवनिर्वाचित सेक्रेटरी तेजगोंड पाटील, जगजित आडनाईक, नवतेज देसाई, अभिजित पत्रावळे उपस्थित होते.

जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत  ॲड. प्रशांत देसाई यांच्या पॅनलने १५ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. अध्यक्षपदासाठी विरोधी असलेले सर्जेराव खोत यांचा केवळ ४४ मतांनी पराभव झाला आणि त्यांना कार्यकारिणीत एक जागा मिळाली. देसाई यांना १०८९ तर खोत यांना १०४५ मते मिळाली. विजयी पॅनलचा निकाल कळताच देसाई पॅनलच्या उमेदवारांसह समर्थकांनी हलगी- ताशांच्या ठेक्यावर न्याय संकुलात गुलालाची उधळण करून विजय साजरा केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.