चंद्रकांत पाटील यांची आज प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांच्या घरी सांत्वनपर भेट… अण्णासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्योजक आर.एम मोहिते यांचे ते ज्येष्ठ पुत्र व उद्योजक दिलीप मोहिते , शिवाजी मोहिते यांचे ते बंधू. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहिते यांच्या घरी जाऊन अण्णासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली कि, कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे नुकतेच निधन झाले. आज मोहिते यांच्या घरी जाऊन अण्णासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले, असे पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले.
कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे नुकतेच निधन झाले. आज मोहिते यांच्या घरी जाऊन अण्णासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. pic.twitter.com/zYq2EZ188S
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 5, 2023