व्यंगचित्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  : आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यंगचित्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट देऊन देशविदेशातील अनेक व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचा आनंद घेतला. व्यंगचित्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे विद्यापीठांनी व्यंगचित्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादा अभ्यासक्रम सुरू करावा, यासाठी शासन सहकार्य करेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात व्यंगचित्रकार टिकावेत, यासाठी एखादी मानधन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करु, असे यावेळी आश्वासन देखील दिले.