कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छता ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्याची आपल्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छता ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही त्यांनी कोथरूडकरांना दिली.
चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे आलेल्या नागरिकांशी संवाद त्यांनी साधला. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.