स्व. डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बोध चिन्हाचे व टीशर्टचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्व. डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २९, ३० आणि ३१ मे २०२३ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट लीगचा बोधचिन्ह आणि सहभागी टीमच्या टी-शर्ट चे अनावरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील करुन स्पर्धेसाठी आयोजक आणि सहभागी होणाऱ्या संघांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बोडके, आर.पी.आय चे परशुराम वाडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गजानन थरकुडे, भाजपा चे धीरज घाटे, मनसे चे सागर पाठक, लिज्जत पापड चे सुरेश कोते, अभिनेत्री प्रिया बेर्डे, चेतन चावडा, अभिजित कोठवालकर, ॲड. मंदार जोशी-भीमयोद्धा फाउंडेशन, संदीप खर्डेकर-क्रिएटिव्ह फाउंडेशन, रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग यांच्यासह जितेश दामोदरे, भारत भोसले, गणेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!