मराठा समाजातील तरुणांना एकाच छताखाली संघटित करुन, उद्योजक होण्यासाठी प्रवीण यांनी प्रेरित केले – चंद्रकांत पाटील

‘वर्ल्ड मराठा ऑर्गनाइज़ेशन’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशातील मराठा उद्योजकांना एकत्र करण्याचे काम प्रवीण यांनी केले. WMO च्या माध्यमातून उद्योजकांना लागेल ते सहकार्य करण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. याबाबत आपल्या पोस्ट मध्ये पाटील लिहतात ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनाइज़ेशन’ चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. मराठा समाजातील तरुणांना एकाच छताखाली संघटित करुन, उद्योजक होण्यासाठी प्रवीण यांनी प्रेरित केले. तसेच कोरोना काळातही त्यांनी केलेले काम अतिशय कौतुकास्पद होते. त्याच्या जाण्याने मराठा समाजातील एक तळमळीचा कार्यकर्ता आपण गमावला आहे. मी प्रवीणला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या दु: खातून सावरण्यासाठी पिसाळ कुटुंबियांना बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती

कोरोनाकाळात अनेक लोकांच्या मदतीला धावून जाणारे प्रवीण पिसाळ यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण WMO परिवार आणि महाराष्ट्रातील उद्योजक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.