चंद्रकांत पाटील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन, आज अवश्य भेट द्या

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दहावी आणि बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी खास करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवार दिनांक २५ मे रोजी आशिष गार्डन मंगल कार्यालय, डीपी रॉड पुणे येथे सकाळी ९ वाजल्या पासून या शिबिराला सुरवात होणार आहे.

दहावी आणि बारावी परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे ‘करिअरच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रातून मिळणार आहेत. यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दहावी आणि बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी खास करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

याशिबिरामध्ये दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी, विद्यार्थ्यांसोबत पालकांचे समोपदेशन, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन याशिबिरामध्ये मिळणार आहे.