महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : रोटरी क्लबच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित दुसऱ्या कोथरुड फेस्ट-२०२३ चे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली नाही तर त्या खूप खचतात, आशा वेळी त्यांच्या प्रॉडक्टला ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून होत आहे. ही खूप चांगली बाब असल्याचे पाटील म्हणाले. महिलांना मदत करणार नाही, तोपर्यंत समाजाची उन्नती होणार नाही. रोटरी सारख्या संस्थांनी त्यास हातभार लावला पाहिजे. त्यासाठी रोटरी क्लबने महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी कायम स्वरुपी मार्केट उपलब्ध करून देण्याचे आवाहन हि चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. तसेच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

सामाजिक दायितवाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले आहे. यावेळी डॉ. अनिल परमार, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरियन डॉ. ऋचा वझे – मोकाशी, रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी, ऍड मंदार जोशी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय निमंत्रक, ऍड अर्चिता मंदार जोशी मा. सदस्य बार असोसिएशन आदी उपस्थित होते.