शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये काल भीषण आग लागून, प्रचंड नुकसान झाले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज टिंबर मार्केट येथे जाऊन घटनास्थळाची पाहाणी केली. या घटनेत काही दुकानांसोबतच काही घरांचेही नुकसान झाले होते हि घटना होऊन काही दिवस झाले नाही कि काल मध्यरात्री मार्केट यार्ड मधील कागद आणि पुठ्ठा साठवणुक असणाऱ्या गोदामाला आग लागली, सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
शहरातील वर्दळीच्या भागात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन, शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.
पोलीस प्रशासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करुन, टिम्बर मार्केट घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना हि पाटील यांनी याआधी दिल्याअसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर ही व्यापाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.