चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचे पाद्यपूजन, भजनी व विशेष साहित्याचे वारकऱ्यांना वाटप

24

पुणे : पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप, वारकऱ्यांना विशेष साहित्य वाटप आणि संत पूजन कार्यक्रम काळ पुण्यातील घरकुल लॉन्स येथे पार पडला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप श्री चंद्रकांत वांजळे महाराज यांचे कीर्तन देखील ठेवण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले कि तुका म्हणे संतसेवा | हेचि देवा उत्तम || आपल्या संस्कृतीत साधू-संतांची सेवा ही ईश्वरची सेवा आहे असं समजलं जातं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वारकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. यात वारीला जाणाऱ्या प्रमुख दिंड्यांच्या प्रमुखांची पाद्यपूजन करुन अभिवादन केले. तसेच वारीसाठी आवश्यक साहित्य भेट म्हणून दिले.‌ अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की, आपला अधिक काळ श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल, असा संकल्प याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

तसेच आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे पाटील म्हणाले, त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

या कार्यक्रमचे संयोजन गिरीश खत्री यांनी केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.