वारीत येणाऱ्या लाखो भाविकांना चित्ररथाच्या माध्यातून देण्यात येणाऱ्या माहितीचा लाभ होईल – चंद्रकांतदादा पाटील

16

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे येथील केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयच्यावतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले, योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. माहिती अभावी नागरिक चांगल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत योजना यासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयदेखील घेण्यात आले. याची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोने चित्ररथ तयार केला असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. वारीत येणाऱ्या लाखो भाविकांना चित्ररथाच्या माध्यातून देण्यात येणाऱ्या माहितीचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.