नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्र अग्रेसर – चंद्रकांत पाटील

18

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीकरिता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच हे शैक्षणिक धोरण सगळयांनी मिळून पुढे घेवून जाऊ असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर,महाविद्यालयचे प्राचार्य,प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.